मंगळवार, १४ डिसेंबर, २०१०

धन्य ते सावकार आणि धन्य ते सरकार...

शेतक-यांच्या आत्महत्याला कॉग्रेसच जबाबदार असुन त्यासंबधी दंड करुन न्यायालयाले सरकारला  फटकारले त्यामुळे शेतक-यांच्या आत्महत्यांचा मुद्दा परत चर्चेत आला आहे.
महाराष्ट्रात विषेशकरुन विदर्भात हजारो शेतक-यांनी कर्जबाजारीपणाला व सावकारी अत्याचाराला कंटाळुन आत्महत्या केल्या,  विरोधी पक्षांनी, मीडीयाने याप्रश्नी रान उठवले, सरकारने त्यावर मात्र त्यावर काही खास उपाययोजेना केल्याचे दिसुन आले नाही, महाराष्ट्राच्या तात्कालीन गृहमंत्र्यांनी सावकारांना फोडुन काढा असे फर्मान काढले खरे परंतु त्याच्यांच सरकारने (तात्कालीन मुखमंत्र्यांनी) सावकारांना पाठीशी घालण्याचे पाप केले, आ.सानंदा यांच्याविरुध्द सावकारी अत्याचाराची एका शेतक-याने दाखल केलेली तक्रार दाखल करुन घेवु नका अथवा त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करु नका असा फोनच संबधीत पोलीसस्टेशन ला त्यावेळी मुखमंत्र्यांनी लावला, मात्र न्यायालयाने या संदर्भात सरकारला चांगलेच फटकारले असुन सरकारला या प्रकरणी १० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. यानिमीत्ताने जनतेसमोर कॉग्रेसी सरकारचा खरा चेहरा उघड झाला आहे. सावकारांना पाठीशी घालुन शेतक-यांना आत्महत्या करायला लावणा-या सरकारचे काय करावे असा प्रश्न जनतेला पडल्यास सावकारांनाच काय सरकारलाही फोडुन काढा असे फर्मान आता काढावे लागेल पण या मांजरांच्या गळ्यात घंटा बांधणार कोण ? सरकारला १० लाख रुपयांचा दंड झाला खरा, परंतु त्या संबधीत शेतक-याची त्या आमदार सावकाराकडे असलेली जमीन त्याला परत कधी मिळणार याचे उत्तर कोणाकडॆच नाही, खरच सरकारने अशा सावकारी प्रवृत्तींना पाठीशी घालुन शेतक-यांच्या आत्महत्याच्या पापाचे धनी होवु नये, कारण महाराष्ट्राला हे नेते कधीच वाचवु शकणार नाहीत, शेतकरीच महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम बनवु शकतो. मात्र आवर्जुन म्हणावेसे वाटते खरच धन्य ते सावकार आणि धन्य ते त्यांना पाठीशी घालणारे सरकार...   

रविवार, १२ डिसेंबर, २०१०

जन पळभरही "हाय हाय" नाही म्हणाले....

आयुष्यभर आम्ही स्वत:ला कोणी
मोठे समजत होतो
मेल्यावर कळले आम्हाला
आम्ही वेडी स्वप्ने रंगवीत होतो
त्यावेळी रस्त्यावर आम्ही
आपले बॅनर डकवित होतो
आम्ही कोणीतरी मोठे
असे जगास भासवीत होतो
मेल्यावर कळले आम्हाला
आम्ही जगास फसवीत होतो
मेल्यावर आम्हा वाटले
जनसागर उसळेल तेथे
गर्दी बघुन सारी
आम्ही कफनात रडत होतो
आम्ही मेल्यावर
जन पळभरही "हाय हाय" नाही म्हणाले
माझॆ मलाच आठवेना
जीवंतपणी आम्ही कार्य तरी काय केले ????

कॉग्रेसचा हा "निरा" उद्योग

कॉगेस ची गाडी बाई हाकतात
अशा कथा सर्वच सांगतात
पण "निरा राडीया" तर म्हणे
कॉग्रेसच्या राजकारणाचे
"उद्योग" पण सांभाळतात
राडीयांची उठ्बस टाटा-बिर्लां पासुन
सचिव, मंत्री अगदी राजा सोबत असते
राजकारणातुन कोणाला उठ्वायचे
आणि मंत्रीपदावर कोणाला बसवायचे
हे "बाईंनी" नाही तर
निरा राडीयांनी ठरवायचे असते
कॉग्रेसचा हा "निरा" उद्योग
टॅपींग ने उघड केला
टाटा कॉगेसचे प्रवक्ते तर
राडीया नवे सत्ताकेंद्र
हा नवा बदल मात्र आम्ही सर्वांनीच पाहीला..

शुक्रवार, १० डिसेंबर, २०१०

....................ही लोकशाही आहे ?

देशात लाखो लोक बेघर
हजारो फुटपाथवर राहतात
चढतात नेत्यांचे मजल्यावर मजले
वर फ्लॅटचे घोटाळे होतात
मग सांगा बरं कशी म्हणता
....................ही लोकशाही आहे ?
आम्ही नेत्यांना निवडुन देतो
ते सोईने पक्षांतर करतात
विरोधी पक्षातले नेते सुध्दा
तडजोडीचे राजकारण करतात
मग सांगा बरं कशी म्हणता
..................ही लोकशाही आहे ?
संसदेत आमचे खासदार
कामापेक्षा गोंधळच करतात
नवे घोटाळे दडपण्यासाठी
जुन्याचे हिशोब मागतात
मग सांगा बरं कशी म्हणता
..................ही लोकशाही आहे ?
लोकांसाठी असलेले लोकांचे राज्य
ही लोकशाहीची कल्पना
आता जुनी झाली
नेत्यांनी त्यांच्याच साठी
चावुन चावुन खाल्लेले
नेत्यांचेच राज्य ही कल्पना
आता सर्वार्थानी रुढ झाली
मग सांगा बरं कशी म्हणता
....................ही लोकशाही आहे ?

बुधवार, ८ डिसेंबर, २०१०

वाराणशीतला बॉम्बस्फोट आणि राजकारण..

२६/११ च्या शहिदांना श्रध्दांजली वाहुन १० दिवस ही पुर्ण झाले नाहीत की दहशतवाद्यांनी परत एकदा वाराणशीत बॉम्बस्फोट घडवुन आणला आणि सरकारी यंत्रणेबरोबरच नागरीकांचीही झोप उडवली. वाराणशीतल्या बॉम्बस्फोटाने एका निश्पाप लहान मुलीला आपले प्राण गमवावे लागले, अनेक नागरीक गंभीर जखमी झाले २६/११ जखम परत ताजी झाली. या दहशतवादाचा संपुर्ण भारतीयांनी मिळून प्रतीकार करायला पाहीजे परंतू यामध्ये आता नविनच राजकारण सुरु झाले आहे. केंद्र सरकार चे गृहखाते आम्ही अशा प्रकारचा हल्ला होवु शकतो सतर्क रहा अशी सुचना उत्तरप्रदेश सरकारला दिली होती परंतू त्यांनी गांभीर्याने घेतले नाही असा आरोप करीत आहे तर मायावतींनी असा कोणताही ईशारा देण्यात आला नव्ह्ता असा पवित्रा घेतला आहे. वास्तवीक पाहता यामध्ये दोघेही दोशी आहेत केंद्र सरकार भित्रे आणि पळपुटे असुन मायावतींनाही या घटनेचे गांभीर्य नाही. प्रत्येक राज्याकडे स्वत:ची सुरक्षा यंत्रणा आहे त्यांनी त्याचा पुरेपुर वापर करुन अशा घटना थांबवायला पाहीजेत, परंतु पोलीसांना सध्या अनेक राजकीय व्यक्तींच्या सुरक्षेत गुंतुन राहावे लागते त्यामुळे त्यांना सामान्य जनतेच्या सुरक्षेकडे लक्ष द्यायला पुरेसा वेळ मिळत नसावा. आपल्या देशातील नागरीकांचे हे दुर्दॆव म्हणावे लागेल की त्यांच्या सुरक्षेची ना केंद्र सरकारला काळजी आहे ना राज्यसरकारला त्यामुळे जनता दोघांनीही वा-यावर सोडली आहे.     
सरकार "कसाब" व "अफजल गुरु" या जावय़ांना का पोसत आहे ?
केंद्र सरकार भित्रे आणि पुळचट आहे अशी जनभावना आहे. भारताच्या संसदेवर आणि मुंबई वर दहशतवादी हल्ला करणा-या अतिरेक्यांना शिक्षा होवुनही सरकार घरजावयासारखे का पोसत आहे हा भारतातील तमाम जनतेला पडलेला प्रश्न आहे, कारण त्यां दहशतवाद्यांना वेळेवर फासावर लटकवले असते तर अतिरेक्यांची हिंमत कमी झाली असती, आंतरराष्ट्रीय समुदायासमोर भारतात लोकशाही परीपक्व आणि लोकशाहीची मुल्य जपणारी आहे हे सिध्द झाले आहे, या हल्ल्यांचे पुरावे भारताने आंतरराष्ट्रीय समुदायासमोर ठेवलेले आहेत तरी आता त्यांना झालेली शिक्षा ठोठावण्यात कोण आडवे येत आहे. यामुळे मात्र दहशतवाद्यांची हिंमत दिवसोंदिवस वाढते आहे. भारत सरकारने आपले भित्रे आणि पुळचट धोरण सोडुन दहशतवादावर कडक उपाययोजना केल्याशिवाय हे थांबणारे नाही, आणि आपासतात एकमेकांवर आरोप करुन राजकारण करण्यापेक्षा दहशतवादाचा समर्थपणे मुकाबला करावा हीच जनतेची अपेक्षा आहे.

मंगळवार, ७ डिसेंबर, २०१०

"विकीलीक्स" च्या ज्युलीयन असांजने अमेरीकेला नाचवले...

विकीलीक्स या जगभर गाजत असलेल्या वेबसाईटचा संस्थापक ज्युलीयन असांज ने सध्या अमेरीकेची झोप उडवली आहे. २००६ मध्ये असांज ने विकीलीक्स ची स्थापना केली, आज ती जगभरात लोकप्रीय झालेली आहे.  जगभरातील विवीध देशांची गोपनीय कागदपत्रांना प्रसीध्दी देवुन खळबळ उडवुन देणा-या विकीलीक्स ने सत्ताधा-यांची झोप उडवली आहे. नुकताच अमेरीकेने भारताला आंतरराष्ट्रीय सुरक्षा परीषदेचे कायमस्वरुपी सदस्यत्व मिळावे यासाठी पाठींबा दर्शवीला होता परंतु विकीलीक्स ने अमेरीकेचा हा दावा कसा खोटा आहे याची गोपनीय कागदपत्रे प्रसीध्द केली आहेत. जगावर राज्य करण्याचे स्वप्न पाहणा-या अमिरीकेला ज्युलीयन असांजने अक्षरश: नाचवले आहे, प्रसीध्द होणा-या गोपनीय कागपत्रांबद्द्ल खुलासे करत जगभर फिरण्याची वेळ ज्युलीयन असांजने अमेरीकेवर आणली आहे. ज्युलीयन असांजला मदत करणारे यंत्रणा ही कार्यरत आहे, त्याला जगभरातुन ही गोपनीय माहीती अशाच मदतगारांकडुन प्राप्त होते,  विकीलीक्स च्या दाव्यानुसार त्यांच्याकडे अशी १० लाख गुप्त आणी स्फोटक कागदपत्रे आहेत आणि त्यांना प्रेसीध्दी मिळाल्यानंतर जगभरात खळबळ माजेल यात शंका नाही.
    विकीलीक्स ने जगभारात अमेरीकेची नाचक्की केली आहे. आपणच जगाचा राजा असल्याचा टेंभा मिरवना-या अमेरीकेचा बुरखा त्यांनी टराटरा फाडला आहे. भविष्यात अमेरीकेचा काळा चेहरा विकीलीक्स जगासमोर आणल्याशिवाय राहणार नाही येवढे मात्र निश्चीत. त्या ज्युलीयन असांजला खरच मानाचा मुजरा... 

शनिवार, ४ डिसेंबर, २०१०

सरकार आणि त्यांचे अधिकारीच खरे गांधीवादी...

रस्त्यावरचे खड्डे पाहुन आम्ही
त्या खड्ड्यात झाडे लावतो
बांधकाम खात्याला त्याचे सोयरसुतक नसते
ती आमची गांधीगिरी....
रोज रोज चकरा मारुनही
ऑफीसात साहेच भेटत नाहीत
तेव्हा आम्ही त्यांच्या
खुर्चीला हार घालतो
ती आमची गांधीगिरी....
विज सारखी ये-जा करते
घंटाभरही टिकत नाही
एमीसीबी चे साहेच काहीच करीत नाहीत
आम्ही त्यांना प्रकाशासाठी कंदील भेट देतो
ती आमची गांधीगिरी....
सरकार असो वा सरकारी कार्यालय
आमचे कुठेच काही चालत नाही
आम्ही आतल्या आत जळत राहतो
मनातल्या मनात निषेध करतो
सारं सहन करण्याची आम्हाला सवय होते
शेवटी आमच्या लक्षात येतं
सरकार आणि सरकारचे अधिकारीच
खरे गांधीवादी
कारण तेच अनुकरण करतात
गांधीजींच्या तिन माकडांचे
जनतेच गा-हाणं ऐकू नका..
लोकांच्या तक्रारीकडे पाहु नका
आणि काही झालं तरी
याबाबत कुठे काहीच बोलु नका...