मंगळवार, ३० नोव्हेंबर, २०१०

बहुचर्चीत "जे.पी,सी."

जेपीसी च्या मागणीवर
विरोधकांनी रान उठवले
कॉग्रेसने ती नाकारुन
विरोधकांना चांगलेच ठकवले
पन्नास कोटी पाण्यात गेले तरी
सरकार मुग गिळून गप्प आहे
घोटाळ्याच्या चौकशीसाठी मात्र
लोकसभेचे कामकाज ठप्प आहे

सोमवार, २९ नोव्हेंबर, २०१०

घराणेशाही

आता सगळीकडेच शिरली
लायकीपेक्षा नातीच मग
महत्वाची ठरली
डॉक्टर चा मुलगा
डॉक्टर होतो
शिक्षकाचा शिक्षक
मग आम्हीच का करु नये
अशी पुस्तीही त्यांनी जोडली
दिल्ली पासुन गल्ली पर्यंत
सर्वच पक्षात घराणेशाही मुरली आहे
राजकारणातील ही गोष्ट नवी नाही
महाभारतातील ध्रुतराष्ट्रापासुनच
ती राजकारणात शिरली आहे...

......................अमोल देशमुख

शनिवार, २७ नोव्हेंबर, २०१०

पुरावे गहाळ करण्याचा कॉग्रेसी अजेंडा..

आदर्श चे तर आता
पुरावेच गहाळ केले
नवे गडी नवे "राज" आले तरी
तरी पहीलेच पाढे पंचावन्न झाले
पुरावेच नाहीत तर हे
चौकशी कशाची करतील
घोटाळेबाज नेते तर आता
उजळ माथ्याने फिरतील 
पुरावेच गहाळ करण्याचा
हा नविन फंडा आहे
पोटभर खावून ढेकर देण्याचा
हा तर भ्रष्ट कॉग्रेसी अजेंडा आहे.

शुक्रवार, २६ नोव्हेंबर, २०१०

हे चिमन्यांनो परत फिरा रे घरकडे आपुल्या.........

जीवापलीकडे जपलेल्या पाखराला
उडण्यास आईवडीलच शिकवतात
पण दुरदेशी गेलेली चिमणी पाखरं
घरट्याकड कशाची परत फिरतात
त्यांचे नवे जग नव्या दुनीयेत
वृध्द आईवडीलांना स्थान नाही
ते बीचारे त्यांच्या वाटेकडे
डोळे लावुन बसतात
याचेही त्यां पाखरांना भान नाही...
(आज अशा खुप वृध्द आईवडीलांना हा अनुभव येत आहे त्यांची मुले परदेशी गेलेले असोत की या देशातच इतरत्र असोत किंबहुना त्याच गावात रहात असोत पण त्यांना वृध्द आईवडीलांकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही, ते आपल्याच हम दो हमारे दो अशा दुनीयेत मग्न असतात त्या अभागी वृध्द आईवडीलांसाठी सुचलेल्या वरील चार ओळी)

..................अमोल देशमुख,माजलागांव(बीड)

गुरुवार, २५ नोव्हेंबर, २०१०

राज ठाकरेंचा मुद्दा किती खरा होता..

महाराष्ट्रात रोजगार शोधण्यापेक्षा
बिहारमध्येच रोजगारनिर्मीती करा
हा राज ठाकरेंचा मुद्दा बरा होता
नितीषकुमारांनी काम केले
बिहार जिंकले तेव्हा लालूंना कळले
हा मुद्दा किती खरा होता

निकाल पाहुन लालूंचे पाय
आता तरी जमीनीवर येतील
दंडुकेशाही करुन सत्ता मिळ्त नाही
हे कळल्यावर
आता तरी ते समाजसेवेकडे वळतील

बुधवार, २४ नोव्हेंबर, २०१०

बिहारमध्ये राजपुत्र राहुल निष्प्रभ...

बिहार निवड्णूकांचे निकाल जाहीर झाले आणि बिहार मध्ये क्रांतीचे नवे पर्व सुरु झाले. विद्यमान मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सर्वात मोठ्या फरकाने विजय मिळवत इतिहास निर्माण केला. नितीशकुमार यांनी कॉग्रेस,राजद,लोजप यांना चारीमुंड्या चित केले. कॉग्रेसने बिहार निवड्णूकांसाठी राजपुत्र राहुल गांधी यांना प्रचारात उतरवले होते, त्यांचा करीष्मा चालेल आणि नितीशकुमार पायउतार होतील असा त्यांना विश्वास होता परंतु नितीशकुमारांची जादु अशी चालली की कॉग्रेसला सर्वात मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले, कॉग्रेसपेक्षा अपक्षांना जास्त जागा मिळाल्या बिहारमध्ये कॉग्रेस साफ झाली. कॉग्रेस हायकमांड ला याचा गांभीर्याने विचार करावा लागेल.
    बिहारची लालुप्रसाद यादव, साधु यादव, वगैरे दादा मंडळींनी देशभरात जी वाईट प्रतीमा निर्माण केली होती ती थोड्या प्रमाणात का होइना पुसण्यात नितीशकुमार यशस्वी झाले. मागील पन्नास वर्षात बिहारमध्ये काहीच विकास झाला नव्हता, रस्ते, विज, पाणी या मुलभुत गरजा ही पुर्ण करणे पुर्वीच्या कॉग्रेस,राजद,लोजप यांना जमले नव्हते, ते काम काही प्रमाणात का होईना मागील पाच वर्षाच्या कार्यकाळात नितीशकुमारांनी करुन दाखवले, अपहरण, खुन, खंडणी ही बिहारमध्ये फार मोठी समस्या होती, बिहारमध्ये सुर्यास्तानंतर हातात बंदुक घेतल्याशिवाय घराबाहेर पडणे अशक्य होते, नितीशकुमारांच्या सरकारने अपहरण, खुन, खंडणी हे प्रकार जवळपास बंद केले, बिहार मध्ये आजपर्यंत फक्त जातीय समीकरणाच्या आधारेच सरकार अस्तीत्वात येत होते, परंतू या वेळेला बिहारच्या जनतेने जातीच्या पुढे जावुन विकासाला मत दिले, महीला आरक्षणामुळे महीलावर्गानेही मोठ्या प्रमाणावर नितीशकुमारांना मत दिले, या सर्वे बाबींमुळे बिहारमध्ये विकासाला चालना मिळेल, रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील,बिहारमधुन रोजगाराच्या शोधात देशाच्या सर्व भागात जाणारा बिहारी बाबू तेथेच थांबेल, विषेशकरुन बिहारमधुन महाराष्ट्रात येणारे बेकारांचे लोंढे थांबतील हाच नितीशकुमार आणि भा.ज.प. च्या विजयाचा अर्थ लावता येईल, मात्र या निवडणुकांमुळे बिहारमध्ये क्रांती झाली..साधु-लालूची गच्छंती झाली.. एवढे मात्र निश्चीत.

सोनीयांही एक दिवस "जय महाराष्ट्र" म्हणतील.

मी मराठीतच बोलणार म्हणत
नव्या मुख्यमंत्र्यांनी आपला
मराठी बाणा दाखवला
मराठीजनांनी मात्र
हिंदीवाल्यांना खडे बोल सुनावनारा
पहीलाच मुख्यमंत्री बघीतला
हिंदी चॅनल वाले आता
मराठीच्या वर्गालाही येतील
मुख्यमंत्र्यांसमोर तरी
मराठीचे बोल बोलतील
मराठी नेत्यांनी असाच
मराठी बाणा जपला तर
सोनीयांही एक दिवस
"जय महाराष्ट्र" म्हणतील.

मंगळवार, २३ नोव्हेंबर, २०१०

टू जी स्पेक्ट्र्म काय आहे ?

टू जी स्पेक्ट्र्म काय आहे
एका घोटाळ्याचं नाव आहे
घोटाळ्यांच्या देशात
राजानेच वसवलेल
एक छोटस गांव आहे
जनतेच्या कल्पनेपलीकडे असणारा
हा घोटाळा किती महान आहे
सत्यम च्या राजूचा
हर्शद च्या शेअरचा
मुंबईतील आदर्श चा
तेलगीच्या मुद्रांकाचा
अन ईटलीच्या बोफोर्स चा
घोटाळा तसा खुपच लहान आहे.

घोटाळेबाज नेते काय काय करतील ?

नेत्यांचे फ्लॅटचे घोटाळे पाहुन
निराश झालेला माझा एक मित्र म्हणाला
वाटलं तर आपण फुटपाथवर राहु
पण आपली घरे आपण या नेत्यांना देवु
या नेत्यांच पोट यानं तरी
भरतं का ते पाहु
मी त्याला म्हणालो
तस काही करु नको बाबा
तु घर देशील
तर ते तुझ शेत मागतील
तु शेत देशील
तर ते तुझ सोनं नाणं मागतील
हे सारं विकुन आलेला पैसा
स्वीस बॅंकेत भरतील
आणि आपण फुटपाथवर रहायला गेल्यावर
ते तेथे राहण्यासाठी परत टोल सुध्दा मागतील
पुढे तर...
आपल्याला मुक्त श्वास घ्यायला सुध्दा
टोल द्यावा लागेल
कारण त्यातही भरपुर पैसा आहे म्हणुन
ते या हवेचाही
खाजगी टेंडर काढून जाहीर लिलाव करतील..