बुधवार, २४ नोव्हेंबर, २०१०

बिहारमध्ये राजपुत्र राहुल निष्प्रभ...

बिहार निवड्णूकांचे निकाल जाहीर झाले आणि बिहार मध्ये क्रांतीचे नवे पर्व सुरु झाले. विद्यमान मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सर्वात मोठ्या फरकाने विजय मिळवत इतिहास निर्माण केला. नितीशकुमार यांनी कॉग्रेस,राजद,लोजप यांना चारीमुंड्या चित केले. कॉग्रेसने बिहार निवड्णूकांसाठी राजपुत्र राहुल गांधी यांना प्रचारात उतरवले होते, त्यांचा करीष्मा चालेल आणि नितीशकुमार पायउतार होतील असा त्यांना विश्वास होता परंतु नितीशकुमारांची जादु अशी चालली की कॉग्रेसला सर्वात मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले, कॉग्रेसपेक्षा अपक्षांना जास्त जागा मिळाल्या बिहारमध्ये कॉग्रेस साफ झाली. कॉग्रेस हायकमांड ला याचा गांभीर्याने विचार करावा लागेल.
    बिहारची लालुप्रसाद यादव, साधु यादव, वगैरे दादा मंडळींनी देशभरात जी वाईट प्रतीमा निर्माण केली होती ती थोड्या प्रमाणात का होइना पुसण्यात नितीशकुमार यशस्वी झाले. मागील पन्नास वर्षात बिहारमध्ये काहीच विकास झाला नव्हता, रस्ते, विज, पाणी या मुलभुत गरजा ही पुर्ण करणे पुर्वीच्या कॉग्रेस,राजद,लोजप यांना जमले नव्हते, ते काम काही प्रमाणात का होईना मागील पाच वर्षाच्या कार्यकाळात नितीशकुमारांनी करुन दाखवले, अपहरण, खुन, खंडणी ही बिहारमध्ये फार मोठी समस्या होती, बिहारमध्ये सुर्यास्तानंतर हातात बंदुक घेतल्याशिवाय घराबाहेर पडणे अशक्य होते, नितीशकुमारांच्या सरकारने अपहरण, खुन, खंडणी हे प्रकार जवळपास बंद केले, बिहार मध्ये आजपर्यंत फक्त जातीय समीकरणाच्या आधारेच सरकार अस्तीत्वात येत होते, परंतू या वेळेला बिहारच्या जनतेने जातीच्या पुढे जावुन विकासाला मत दिले, महीला आरक्षणामुळे महीलावर्गानेही मोठ्या प्रमाणावर नितीशकुमारांना मत दिले, या सर्वे बाबींमुळे बिहारमध्ये विकासाला चालना मिळेल, रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील,बिहारमधुन रोजगाराच्या शोधात देशाच्या सर्व भागात जाणारा बिहारी बाबू तेथेच थांबेल, विषेशकरुन बिहारमधुन महाराष्ट्रात येणारे बेकारांचे लोंढे थांबतील हाच नितीशकुमार आणि भा.ज.प. च्या विजयाचा अर्थ लावता येईल, मात्र या निवडणुकांमुळे बिहारमध्ये क्रांती झाली..साधु-लालूची गच्छंती झाली.. एवढे मात्र निश्चीत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा