बुधवार, ८ डिसेंबर, २०१०

वाराणशीतला बॉम्बस्फोट आणि राजकारण..

२६/११ च्या शहिदांना श्रध्दांजली वाहुन १० दिवस ही पुर्ण झाले नाहीत की दहशतवाद्यांनी परत एकदा वाराणशीत बॉम्बस्फोट घडवुन आणला आणि सरकारी यंत्रणेबरोबरच नागरीकांचीही झोप उडवली. वाराणशीतल्या बॉम्बस्फोटाने एका निश्पाप लहान मुलीला आपले प्राण गमवावे लागले, अनेक नागरीक गंभीर जखमी झाले २६/११ जखम परत ताजी झाली. या दहशतवादाचा संपुर्ण भारतीयांनी मिळून प्रतीकार करायला पाहीजे परंतू यामध्ये आता नविनच राजकारण सुरु झाले आहे. केंद्र सरकार चे गृहखाते आम्ही अशा प्रकारचा हल्ला होवु शकतो सतर्क रहा अशी सुचना उत्तरप्रदेश सरकारला दिली होती परंतू त्यांनी गांभीर्याने घेतले नाही असा आरोप करीत आहे तर मायावतींनी असा कोणताही ईशारा देण्यात आला नव्ह्ता असा पवित्रा घेतला आहे. वास्तवीक पाहता यामध्ये दोघेही दोशी आहेत केंद्र सरकार भित्रे आणि पळपुटे असुन मायावतींनाही या घटनेचे गांभीर्य नाही. प्रत्येक राज्याकडे स्वत:ची सुरक्षा यंत्रणा आहे त्यांनी त्याचा पुरेपुर वापर करुन अशा घटना थांबवायला पाहीजेत, परंतु पोलीसांना सध्या अनेक राजकीय व्यक्तींच्या सुरक्षेत गुंतुन राहावे लागते त्यामुळे त्यांना सामान्य जनतेच्या सुरक्षेकडे लक्ष द्यायला पुरेसा वेळ मिळत नसावा. आपल्या देशातील नागरीकांचे हे दुर्दॆव म्हणावे लागेल की त्यांच्या सुरक्षेची ना केंद्र सरकारला काळजी आहे ना राज्यसरकारला त्यामुळे जनता दोघांनीही वा-यावर सोडली आहे.     
सरकार "कसाब" व "अफजल गुरु" या जावय़ांना का पोसत आहे ?
केंद्र सरकार भित्रे आणि पुळचट आहे अशी जनभावना आहे. भारताच्या संसदेवर आणि मुंबई वर दहशतवादी हल्ला करणा-या अतिरेक्यांना शिक्षा होवुनही सरकार घरजावयासारखे का पोसत आहे हा भारतातील तमाम जनतेला पडलेला प्रश्न आहे, कारण त्यां दहशतवाद्यांना वेळेवर फासावर लटकवले असते तर अतिरेक्यांची हिंमत कमी झाली असती, आंतरराष्ट्रीय समुदायासमोर भारतात लोकशाही परीपक्व आणि लोकशाहीची मुल्य जपणारी आहे हे सिध्द झाले आहे, या हल्ल्यांचे पुरावे भारताने आंतरराष्ट्रीय समुदायासमोर ठेवलेले आहेत तरी आता त्यांना झालेली शिक्षा ठोठावण्यात कोण आडवे येत आहे. यामुळे मात्र दहशतवाद्यांची हिंमत दिवसोंदिवस वाढते आहे. भारत सरकारने आपले भित्रे आणि पुळचट धोरण सोडुन दहशतवादावर कडक उपाययोजना केल्याशिवाय हे थांबणारे नाही, आणि आपासतात एकमेकांवर आरोप करुन राजकारण करण्यापेक्षा दहशतवादाचा समर्थपणे मुकाबला करावा हीच जनतेची अपेक्षा आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा